कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातल्या तीन हजार लोकवस्तीच्या तिटवे या छोट्या खेड्यातून सुरू झालेला हा प्रवास. कोल्हापूरजवळील चंबुखडी टेकडीच्या परिसरातील विद्यानिकेतनमध्ये स्वप्नं पाहण्याची सवय लागली आणि त्याच स्वप्नांनी जगस पादाक्रांत केलं. अत्यंत सामान्य स्थितीतील तरुण अपयशाच्या अनेक झटक्यांतून सावरून फिनिक्स पक्ष्यांप्रमाणे कसा भरारी मारतो, याची ही चित्तवेधक कहाणी आहे. परिस्तितीचे रडगाणे न गाता संकटांच्या छातीवर पाय देऊन कसे उभे राहायचे, याची प्रेरणा या प्रवासातून मिळू शकते. जातिवाद, प्रांतवाद, वर्णभेद, वंशभेदाचे अनेक अडथळे हा फ्रवास रोखु शकले नाहीत. संघर्,शील प्रवासातही कृतज्ञतेचा अखंड झुळझुळणारा झरा, हे या कथनाचे आणखी एक वैशिष्ट्य. चङुबाजुंनी नैराश्याने ग्रासलेल्या परिस्थितीत हे कथन निश्चितच आजच्या तरूणांना प्रेरणा देणारे ठरेल.